आमच्याविषयी
बालकांच्या मनोरंजनासाठी व प्रबोधनासाठी जे काही रंगमंचावर सादर होते ते बालरंगभूमीच्या व्याख्येत येते. नृत्य – नाट्य – गायन – वादन या रंगमंचीय कलांसोबत लहान मुलांना रमवणारे बाहुल्यांचे खेळ, जादूचे खेळ, शॅडो प्ले, जगलरी इ. खेळ बालरंगभूमीच्या कक्षेत येतात.
शिक्षण हा बालकांचा अधिकार आहे आणि कलाशिक्षण बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाची गरज आहे. मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या रंगमंचीय कलेचा, खेळांचा प्रचार आणि प्रसार हे बालरंगभूमी परिषदेचे मुख्य उद्दिष्ट असेल.
बालरंगभूमीशी संबंधित सर्व संस्था, कलावंत, बालकलाकार व बालप्रेक्षकांच्या हितासाठी ‘बालरंगभूमी परिषदेची’ स्थापना झाली आहे. मनोरंजनातून प्रबोधनाचे कार्य प्रत्येक मुलांपर्यंत पोहचवण्याचे कार्य बालरंगभूमी परिषद करणार आहे.

अध्यक्षांचे मनोगत
नमस्कार!
शिक्षण हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे.तसेच बालरंगभूमी ही प्रत्येक बालकाची गरज आहे. मनोरंजनातून प्रबोधन करणारी बालरंगभूमी ही बालमनावर संस्कार करते. बालकांचे व्यक्तिमत्त्व घडवते. मुलांच्या मनोरंजनासाठी आणि प्रबोधनासाठी मंचावरून जे जे सादर होते…ती बालरंगभूमी!
बालरंगभूमीची ही सोपी, सुटसुटीत व्याख्या स्वीकारून “बालरंगभूमी परिषदेची” स्थापना जुलै २०१८ मध्ये झाली. बालरंगभूमी परिषदेला ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची’ मान्यता मिळून त्या संस्थेशी संलग्न राहण्याचा संकल्प बालरंगभूमी परिषदेच्या घटनेत आहे. बालरंगभूमी परिषद ही नाटय परिषद प्रमाणे फक्त नाटय क्षेत्राशी संबंधित नसून, नृत्य, गायन, वादन, जादू इत्यादी कला प्रकारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी कटिबध्द आहे.
शिक्षण हा बालकांचा अधिकार आहे आणि कलाशिक्षण बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाची गरज आहे. मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या रंगमंचीय कलेचा, खेळांचा प्रचार आणि प्रसार हे बालरंगभूमी परिषदेचे मुख्य उद्दिष्ट असेल.
बालरंगभूमीशी संबंधित सर्व संस्था, कलावंत, बालकलाकार व बालप्रेक्षकांच्या हितासाठी ‘बालरंगभूमी परिषदेची’ स्थापना झाली आहे. मनोरंजनातून प्रबोधनाचे कार्य प्रत्येक मुलांपर्यंत पोहचवण्याचे कार्य बालरंगभूमी परिषद करणार आहे.
ॲड.नीलम शिर्के सामंत
अध्यक्ष
बालरंगभूमी परिषद