सस्नेह नमस्कार,
महाराष्ट्राची कला व परंपरा जपताना बालमनावर संस्कार करत, उद्याची कलासक्त व सशक्त पिढी घडविण्याचे कार्य गेली अनेक वर्षे बालरंगभूमी परिषद करत आहे. त्याच अनुषंगाने बालकांसाठी लोककला महोत्सवाचे आयोजन बालरंगभूमी परिषद करत असते. लोककलांचा प्रगल्भ वारसा असलेल्या आपल्या महाराष्ट्रात लोककलांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी, यासाठी बालरंगभूमी परिषदेने स्वतःची एक स्वतंत्र भूमिका स्वीकारली आहे. केवळ महोत्सवी किंवा मनोरंजनात्मक असे स्वरुप न ठेवता ही लोकचळवळ व्हावी, लोककलांची माहिती व महती बालकांपर्यंत पोहचवितांना गायन, वादन, नृत्य क्षेत्रात ज्ञान व कौशल्य प्राप्त करुन, लोककलेबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी हा या महोत्सवामागील उद्देश आहे.
जिल्हानिहाय आयोजित होणाऱ्या या महोत्सवात गतवर्षी राज्यातील ४० हजाराहून अधिक बालकांनी गायन, वादन व नृत्य या तिन्ही प्रकारात आपले कौशल्य दाखवत उत्तमरित्या सादरीकरण केले होते. या वर्षीही जास्तीत जास्त संख्येने बालगोपाल या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या लोककलांनी संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडतील… खऱ्या अर्थाने जल्लोष लोककलेचा होईल. महाराष्ट्रातील तमाम शाळा, संस्था, शिक्षक, पालक व विद्यार्थी – विद्यार्थिंनींना विनम्र आवाहन आहे की, या महोत्सवात सहभागी होऊन चला उधळूया लोकरंग…

इतिहास महाराष्ट्राचा
प्राथमिक फेरी :
महाराष्ट्रातील शाखा स्थरावर प्राथमिक फेरी आयोजित करून त्यातील एकल गटातून वयोगट १ मधील प्रथम आणि द्वितीय, वयोगट २ मधील प्रथम आणि द्वितीय तसेच समूह गटातून प्रथम आणि द्वितीय असे स्पर्धक अंतिम फेरीकरीता निवड होईल.
एकल गटात सादरीकरणाकरीता अवधी जास्तीत जास्त ५ मिनिट असून समूह गटाकरीता जास्तीत जास्त १० मिनिटे असेल.
एकल गट १ मध्ये सहभागी स्पर्धक बालकांनी आपण स्वतः छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्याकाळातील इतर व्यक्तिमत्वे आणि त्यांच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज अशा स्वरुपात महाराजांच्या बालपणातील घटना, शौर्य, शिक्षण, पराक्रम, राजमाता जिजाऊंची प्रेरणा याबद्दल नाट्य, नृत्य, गायन यांच्या समन्वयाने प्रभावी सादरीकरण करणे अपेक्षित आहे. एकल गट २ आणि समूह गट मधील सहभागी स्पर्धक/ संघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव ते राज्याभिषेक या कालखंडातील जास्तीत जास्त शौर्य घटना, विविध प्रसंग, गडकिल्यांवरील विजय, पराक्रम आदी घटनांचे जास्तीत जास्त संदर्भ घेत सादरीकरण करावं. या सादरीकरणात कमीत कमी ४ आणि जास्तीत जास्त ८ बालकांचा सहभाग असावा.
समूह सादरीकरणामध्ये नृत्य, नाट्य, संगीत, शिल्पकला, चित्रकला किंवा इतर कला प्रकारांचा समन्वय करून सादरीकरण प्रभावी करता येईल.
प्राथमिक तसेच अंतिम फेरीतील सर्व सहभागी तसेच विजेत्या स्पर्धक / संघांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येईल.
प्राथमिक फेरी १५ ऑगस्ट, २०२५ पर्यंत आयोजित होऊन अंतिम फेरीकरीता पात्र संघ / बाल कलावंतांची नावे १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत मध्यवर्तीला कळवली जातील.
प्राथमिक फेरीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया टीमतर्फे सोशल मीडियावरही प्रसिध्द होतील.
अंतिम फेरी :
अंतिम फेरी मुंबई येथे दिनांक २३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात येईल.
अंतिम फेरीकरीता निवड झालेल्या केवळ स्पर्धक बाल कलावंतांचा प्रवास खर्च मध्यवर्तीकडून देण्यात येईल (बस किंवा रेल्वेचे स्लीपरच्या दरानुसार).
समूह किंवा एकल सादरीकरणाकरीता वाद्यवृंद, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा यांची व्यवस्था संघाला स्वतः करावी लागेल. आयोजकांद्वारे केवळ ध्वनी व प्रकाशयोजनेची व्यवस्था करण्यात येईल. सादरीकरणासाठी वेशभूषा, रंगभूषा किंवा इतर साहित्यासाठी कुठलाही खर्च मध्यवर्तीकडून दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
ज्या शाखेतर्फे नावीन्यपूर्ण सादरीकरण करण्यात येईल, त्या शाखेचाही अंतिम फेरी पारितोषिक सोहळ्यात सन्मान करण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल.

आरोग्य तपासणी शिबिर
कला संस्कार शिबिर

‘यहाँ के हम सिकंदर’

सस्नेह नमस्कार,
बालरंगभूमी परिषद मुलांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मुलांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने कार्य करत असताना, विशेष मुलांनासुद्धा व्यासपीठ उपलब्ध व्हावे. त्यांच्यातील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देवून, त्यांना सक्षम मुलांच्या प्रवाहात आणण्याकरिता ‘यहाँ के हम सिकंदर’ हा विशेष मुलांच्या कलागुण सादरीकरणाचा उद्देश आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून विशेष मुलांच्या कलागुणांना, त्यांनी तयार केलेल्या कलाकृतींना प्रोत्साहन तर मिळेलच पण या विशेष मुलांसाठी असणाऱ्या संस्था, शाळा यांचाही गौरव या निमित्ताने करण्यात येणार आहे.
जिल्हानिहाय आयोजन होणाऱ्या या महोत्सवात महाराष्ट्रातील विशेष मुलांकरिता असणाऱ्या शाळा, संस्था, शिक्षक यांना विनम्र आवाहन आहे की, या महोत्सवात सहभागी होऊन सहकार्य करावे.

विनीत
ॲड. निलम शिर्के – सामंत (अध्यक्ष)
बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती शाखा, मुंबई

‘यहाँ के हम सिकंदर’ महोत्सव नियमावली

१.हा महोत्सव प्रत्येक जिल्हास्तरावर लघू व महामहोत्सव स्वरुपात संपन्न होईल.
२.शाखेच्या जिल्ह्यातील कर्णबधीर, मूकबधीर, अंध, गतीमंद, अस्थिव्यंग अशा दिव्यांग प्रकारात मोडणारे सर्व अनुदानीत, विनाअनुदानीत शाळा/ संस्थाना यात सहभाग घेता येईल.
३.वय वर्षे १८ खालील सर्व मुले, मुली यात सहभागी होवू शकतात. प्रत्येक संघात १० मुले असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त कितीही मुले सहभागी होऊ शकतात.
४.विशेष मुलांच्या गुणकौशल्याचे कौतुक करणारा हा महोत्सव असून ही स्पर्धा नाही. प्रत्येक सहभागी संघांने १० मिनीटांचे सादरीकरण करावयाचे आहे. (उदा. नाटक, नकला, गाणे, नृत्य, रांगोळी, चित्र, योगा, वाद्य वाजवणे व इतर कलागुण सादरीकरण)
५.⁠ ⁠प्रत्येक संघास सादरीकरणापोटी रु.५०००/- मानदेय देण्यात येईल. परंतु यासाठी कलावंत संख्या १० असणे आवश्यक आहे. १० पेक्षा कमी असल्यास त्यांना मानदेय देण्यात येणार नाही. एका केंद्रावर प्रत्यक्ष सादरीकरण संख्या किमान ५ असणे आवश्यक आहे. पाचपेक्षा कमी असल्यास त्यांचे सादरीकरण शेजारील जिल्ह्याच्या महोत्सवात होईल.
६.⁠ ⁠महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व मुलांना सहभाग प्रमाणपत्र मिळेल.
७.मुलांची सुरक्षा, काळजी महत्वाची असल्याने प्रत्येक संघाने त्याची जबाबदारी घ्यावयाची आहे.
८.⁠ ⁠प्रत्येक संघास व शिक्षक/मार्गदर्शकास सहभाग स्मृतीचिन्ह देवून सन्मानित केले जाईल.
९.⁠ ⁠प्रत्येक संघाने पत्राद्वारे कळवलेल्या सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शकांच्या अल्पोपहाराची व्यवस्था केली जाईल.
१०.महोत्सव स्थळी आपल्या संस्थेने / शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्याच वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठीसुध्दा ठेवता येईल.
११.⁠ ⁠आपल्या शाळेतर्फे महोत्सवात सहभागी होत असल्याचे तसेच विद्यार्थी व शिक्षक संख्येसह पत्र बालरंगभूमी शाखेकडे द्यावे.
१२.संघांनी महोत्सवात पाळलेली शिस्त, नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.
१३.⁠ ⁠प्रत्येक सहभागी संस्थेने/शाळेने आपले बँक खात्याचा तपशिल व सहभागी कलावंत, शिक्षक तसेच दिव्यांग प्रेक्षकांच्या नावांची यादी द्यावी.


धनंजय जोशी (समिती प्रमुख)
नंदकिशोर जुवेकर (समिती सदस्य)
दिपाली शेळके (समिती सदस्य)
नागसेन पेंढारकर (समिती सदस्य)
‘यहाँ के हम सिकंदर’ महोत्सव समिती

लोककला महोत्सवाचे उद्दिष्ट

महाराष्ट्राची कला व परंपरा जपताना बालमनावर संस्कार करत, कलासक्त पण सशक्त पिढी घडवण्याचे कार्य, गेली अनेक वर्षे बालरंगभूमी परिषद करते आहे. त्याच अनुषंगाने यंदा बालकांसाठी लोककला महोत्सवाचे आयोजन परिषद करीत आहे. लोककलांचा प्रगल्भ वारसा असलेल्या महाराष्ट्रात लोककलांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी यासाठी परिषदेने स्वतःची एक स्वतंत्र भूमिका स्वीकारली आहे. केवळ महोत्सवी किंवा मनोरंजनात्मक स्वरुप न ठेवता ही लोकचळवळ व्हावी, लोककलांची माहिती व महती बालकांपर्यंत – विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवितांना गायन,वादन, नृत्य क्षेत्रात ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करण्याची संधी मुलांना प्राप्त व्हावी या हेतूने परिषदेने महोत्सवात लोककला प्रशिक्षण व सादरीकरण अशा दोन टप्प्यावर आयोजनाचा घाट घातला आहे.

 जिल्हानिहाय आयोजन होणाऱ्या या महोत्सवात प्रारंभिक लोककला प्रशिक्षण कार्यशाळा तर दुसऱ्या टप्प्यात लोककला सादरीकरण होईल. यातून सबंध महाराष्ट्र एकाचवेळी बाल गोपाळांच्या लोककलांनी दणाणून जाईल… खऱ्या अर्थाने जल्लोष लोककलेचा होईल. यात महाराष्ट्रातील तमाम शाळा, संस्था, शिक्षक, बालक, विद्यार्थ्यांना विनम्र आवाहन आहे की, या महोत्सवात सहभागी होऊन चला उधळूया लोकरंग..

लोककला महोत्सव नियमावली

 १.⁠ ⁠महोत्सव केवळ महाराष्ट्रीय लोककलांचा असून लोककला प्रकारातीलच गीत, नृत्य व वाद्य आवश्यक असतील.
 २.⁠ ⁠महोत्सवात लोकनृत्य (समूह /एकल) लोकगीत (समूह /एकल) लोकवाद्य (एकल) प्रकारांचा समावेश असेल प्रत्येक कलाप्रकाराचे स्वतंत्र सादरीकरण होईल.
 ३.⁠ ⁠महोत्सव जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात येईल.
 ४.⁠ ⁠महोत्सवात वय वर्ष ६ ते १५ वर्षांच्या मुलांना सहभागी होता येईल.
 ५.⁠ ⁠महोत्सवात किमान २५ संघाना तर एकल सादरीकरणासाठी ५० कलाकारांना प्रवेश देण्यात येईल. याबाबतचा अंतिम निर्णय जिल्हा शाखा घेतील. परिषदेने मागणी केल्यास सादरीकरणाची व्हिडिओ क्लिप ऑनलाइन पाठवावी लागेल.
 ६.⁠ ⁠महोत्सवात शालेय संस्था आणि मान्यता प्राप्त नृत्य/ संगीत संस्था सहभागी होऊ शकतील.
 ७.⁠ ⁠एकल कलाप्रकारासाठी रु. २००/- तर समूह कलाप्रकारासाठी रु. ५००/- इतकी अनामत रक्कम जिल्हा शाखेच्या बँक खात्यात जमा करणे आवश्यक आहे. सादरीकरणानंतर सदर अनामत रक्कम संस्थेच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. जो कलाकार अथवा संघ सादरीकरण करणार नाही त्यास कोणत्याही कारणास्तव अनामत रक्कम परत मिळणार नाही.
 ८.⁠ ⁠निर्धारित प्रवेश अर्ज भरुन संस्थेच्या लेटरहेड सोबत मुख्याध्यापक/संस्थाप्रमुख/संघ प्रमुखांच्या सही शिक्क्यानिशी महोत्सवात प्रवेश घ्यावा लागेल.
 ९.⁠ ⁠कोणत्याही संस्थेस जास्तीत जास्त दोन प्रवेशिका सांघिक सादरीकरणासाठी दाखल करता येतील.
१०.⁠ ⁠सादरीकरण कालमर्यादा समूह नृत्य व समूहगीतासाठी कमीतकमी ६ मि.व अधिकाधिक ८ मि. तर एकल सादरीकरणासाठी कमीतकमी ३ व अधिकाधिक ४ मि. कालमर्यादा असेल.
११.⁠ ⁠समूह/सांघिक सादरीकरण करणाऱ्या संघात किमान १० बालकलाकार असणे आवश्यक आहे.
१२.⁠ ⁠एकल गीत गायनासाठी sound track किंवा स्वतःचे वाद्यवृंद साथीदार वापरता येतील. तसेच लोकनृत्यासाठी ध्वनिमुद्रित/रेकॉर्ड लोकगीत वापरता येईल. प्रत्यक्ष वाद्यवृंद असल्यास त्यास विशेष प्राधान्य दिले जाईल.
१३.⁠ ⁠रंगभूषा, वेशभूषा व प्रवास खर्च सहभागी कलाकार/संघाने करावयाचा आहे.
१४.⁠ ⁠सहभागी कलाकार/संघांना संयोजकांच्यावतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येईल.
१५.⁠ ⁠महोत्सवात सहभागी होणाऱ्या अव्वल कलाकृतींना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येतील.
१६.⁠ ⁠पुरस्कार संबंधित परीक्षकांचे निर्णय अंतिम राहतील.
१७. या महोत्सवाचे नियम व अटी यात बदल करण्याचे सर्वाधिकार कार्यकारी मंडळ मध्यवर्ती मुंबई यांचेकडे राखून ठेवण्यात येत आहे तसेच कोणत्याही कारणास्तव कार्यक्रमाच्या तारखेत आणि वेळेत बदल करण्याचा अधिकार परिषद स्वतःकडे राखून ठेवत आहे.

लोककला महोत्सव - २०२४ पुरस्कार

समूह नृत्य व समूह गीत
सर्वोत्कृष्ट : रू.११,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
उत्कृष्ट : रू.७,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
उत्तम : रू.५,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
प्रशंसनीय (२) : रू.२०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र

 

एकल गीत, एकल नृत्य, एकल वाद्यवादन
सर्वोत्कृष्ट : रू.३,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
उत्कृष्ट : रू.२,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
उत्तम : रू.१,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
प्रशंसनीय (२) : रू.५००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
(सर्व बालकलाकारांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.)

Scroll to Top