उपक्रम

दि. १७ ऑगस्ट २०२४
बीडमध्ये बालकलावंतांच्या लोककलेचा जल्लोष जल्लोष लोककलेचा’ हा उपक्रम घेण्यात आला. बालरंगभूमी परिषद मुंबईच्या मा. अध्यक्ष निलम शिर्के यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत गायन, वादन आणि नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये सहभागी झालेल्या बालकलावंताना प्रमाणपत्र तर विजेत्या कलावंताना रोख रक्कमेच्या स्वरुपात पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात लोकगीत, समूहलोकनृत्य, वैयक्तीक लोकनृत्य, वैयक्तीक लोकवाद्य आदीसारख्या कला प्रकारांचे उत्तम सादरीकरण करण्यात आले.

दि. ५ ऑक्टोंबर २०२४
बीडमध्ये दिव्यांग बालकांनी जिंकली प्रेक्षकांची मने ‘यहाँ के हम सिकंदर’ या दिव्यांग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. जन्माने दिव्यांग असलेल्या परंतु जन्मजात कलागुण घेऊन जन्मलेल्या बालकांच्या कलागुणांना संधी देणारा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये अनेक दिव्यांग बालकांनी आपली कला सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत आणि कौतुक करण्यात आले.