उपक्रम

दि. २२ सप्टेंबर २०२४
परभणी : जल्लोष लोककलेचामधून बालकांना झाली कला आणि संस्कृतीची ओळख
भावी पिढीला कला आणि संस्कृती यांची जाणीव व ओळख व्हावी या उद्देशाने बालरंगभूमी परभणीच्या वतीने १२ ऑगस्ट रोजी जल्लोष लोककलेचा लोककला प्रशिक्षण शिबिर विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले. ‘जल्लोष लोककलेचा’ हा परभणी जिल्हा शाखेतर्फे शनिवार, दि. २२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोककला महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास बालरंगभूमी परिषद मुंबई मध्यवर्ती शाखेच्या मा. अध्यक्ष अॅड. निलमताई शिर्के-सामंत या उपस्थित होत्या. टाळापासून ते चाळापर्यंत अनेक संमेलने पार पडलेल्या या नगरीत जल्लोष लोककलेचा हा महोत्सव उत्साहात पार पडला. औक्षण झाल्यानंतर निलमताई यांच्यासह स्वागताध्यक्ष परभणीचे पहिले महापौर प्रताप भैय्या देशमुख, ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या सचिव माजी प्राचार्य डॉ. संध्याताई दुधगावकर, संतोष धारासुरकर, परभणी शाखेचे अध्यक्ष आबा ढोले, उपाध्यक्ष प्रा.नितीन लोहट, गोंधळ सम्राट गुलाबराव कदम यांची उपस्थिती होती.समूह स्पर्धेत २८ तर एकल मध्ये ६२ स्पर्धक होते.