परिषदेची घटना​

सभासदत्वाचे प्रकार

१) सर्वसाधारण /वार्षिक सभासद : रु.१५१/- देणारे.
२) क्रियाशील आजीव सभासद : रु.६००/- किंवा अधिक देणारे (दोन वर्ष रंगभूमीशी संबंधित असणारे पात्र ठरतील)
३) आश्रयदाते : रु.२५०००/- किंवा अधिक एकरकमी देणारे.
४) हितचिंतक : रु.५०००/- किंवा अधिक एकरकमी देणारे.

आयोजित कार्यक्रम :

बालनाट्य शिबिर, नाट्यशिक्षकांसाठी कार्यशाळा, बालनाट्य प्रयोग, बालनाट्य स्पर्धा (मराठी – संस्कृत – बहुभाषी), नृत्य – नाट्य – गायन – वादन यांचे महोत्सव, एकपात्री व नाट्यछटा स्पर्धा, बाल चित्रपट महोत्सव, नाट्यसंहिता लायब्ररी

कार्यक्षेत्र

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यात बालरंगभूमी परिषदेच्या शाखा स्थापन करुन रंगमंचीय चळवळ मुलांपर्यंत पोहचवली जाईल. भाषेचा अडसर न ठेवता भविष्यात भारतातील अन्य राज्यात बालरंगभूमी परिषदेच्या शाखा स्थापन करण्यात येतील.

सभासदत्व

१८ वर्ष पूर्ण झालेल्या व संस्थेची घटना आणि नियम मान्य असणाऱ्या व्यक्तीस सभासद होता येईल.

Scroll to Top