उपक्रम

दि. ७ ऑक्टोबर २०२४
नंदुरबारमध्ये ४५० बालकलावंतांनी सादर केल्या लोककला बालरंगभूमी परिषदेच्या लोककला महोत्सवात जिल्ह्यातील ३५ शाळांच्या ४५० बालकलावंतांनी महाराष्ट्रातील विविध लोककलांचे दर्शन घडविले. बालकलावंतांच्या या सादरीकरणाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात झालेल्या या महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ लोककलावंत रायसिंग हिरा पाडवी यांनी केले. यावेळी बालरंगभूमी परिषदेचे कार्याध्यक्ष राजीव तुलालवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी, उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण, बालरंगभूमी परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य नागसेन पेंढारकर उपस्थित होते.

दि. ९ ऑक्टोबर २०२४
नंदुरबारमध्ये दिव्यांगाना मिळाला हक्काचा रंगमंच दिव्यांग बालकलावंतांना हक्कांचा रंगमंच उपलब्ध करून देणारा यहाँ के हम सिंकदर नंदुरबारला ९ ऑक्टोबरला साजरा करण्यात आला. इंदिरा मंगल कार्यालयात उत्साहात पार पडलेल्या या महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव मोरे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन वळवी, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आत्मारामबापू इंदवे, बारकू पाटील, बालरंगभूमी परिषदेचे मध्यवर्ती कार्यकारिणी सदस्य योगेश शुक्ल, तसेच नंदुरबार जिल्हा शाखेचे प्रमुख कार्यवाह नागसेन पेंढारकर, अध्यक्ष राजेश जाधव, उपाध्यक्ष मनोज सोनार आदी उपस्थित होते. महोत्सवात एकूण ९ दिव्यांगा शाळांमधील ११० दिव्यांग कलावंतांनी सहभाग नोंदविला तसेच १०० दिव्यांग प्रेक्षकांनी या महोत्सवाचा आनंद घेतला.

Scroll to Top