उपक्रम

दि. १६ ऑगस्ट २०२४
बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेने ऑगस्ट महिन्यात ‘जल्लोष लोककलेचा’ या उपक्रमातंर्गत प्रथमतः जिल्ह्यातील ५ ठिकाणी लोककला कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेतील महाराष्ट्राच्या विशेषतः खान्देशच्या लोककलांविषयी विद्यार्थी – विद्यार्थिंनींना माहिती देण्यात आली. या कार्यशाळांतून ५ हजार विद्यार्थी – विद्यार्थिंनींनी सहभाग घेतला होता.

दि. २२ सप्टेंबर २०२४
७८० विद्यार्थ्यांच्या सहभागात जळगावात जल्लोष लोककलेचा दि. २१ व २२ सप्टेंबर असे दोन दिवस आयोजित केलेल्या या महोत्सवात ७८० बालकलावंतांनी आपल्या कलांचे सादरीकरण केले.दुसऱ्या दिवशी समूह लोकगीत व समूह लोकनृत्याच्या सादरीकरणात एकूण २७ शाळांचा सहभाग घेतला होता.पारितोषिक वितरणाच्या सोहळ्याप्रसंगी प्रास्ताविकात प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी दोन दिवसात झालेल्या महोत्सवाचा आढावा मांडला. या महोत्सवात दोन दिवसात ७८० बालकलावंतांनी लोककलांचे सादरीकरण केले. तसेच या महोत्सवाला शहरातील भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाऊंडेशन तसेच मृदंग ॲड्‌स यांचे लाभलेल्या अनमोल सहकार्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.श्रध्दा पाटील यांनी केले.

दि. १० ऑक्टोबर २०२४
जळगाव : दिव्यांग बालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारा कलामहोत्सव बालरंगभूमी परिषदेतर्फे ‘यहाँ के हम सिकंदर’ या विशेष मुलांच्या कलामहोत्सवाचे जळगावात आयोजन करण्यात आले होते. शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रंगलेल्या या कलामहोत्सवाने ६०० दिव्यांग बालकांच्या व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले. दिव्यांग बालकांसाठी गेल्या २२ वर्षांपासून काम करत असणाऱ्या बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विशेष मुलांच्या कलामहोत्सवाच्या उद्‌घाटन प्रसंगी रंगमंचावर बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर प्रविण सिंग, नवजीवन प्लस सुपरशॉपचे संचालक अनिलभाई कांकरिया, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, विशेष दिव्यांग विभागाच्या वैद्यकिय सामाजिक कार्यकर्त्या माधुरी भागवत, बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्तीकडून आलेले निरीक्षक नागसेन पेंढारकर आदी उपस्थित होते.सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलन झाल्यानंतर उत्कर्ष मतिमंद विद्यालयाचा विद्यार्थी सागर गायकवाड याने स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक करतांना विनोद ढगे यांनी या कलामहोत्सव आयोजनामागची भूमिका व महत्व विषद केले. कलामहोत्सवाच्या समारोप प्रसंगी डॉ.इंद्राणी मिश्रा व हेमाताई अमळकर यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी दिव्यांग बालकांचे कौतुक करण्यासोबतच सर्व सहभागी दिव्यांग बालकलावंतांना व दिव्यांग विद्यालयांना प्रमाणपत्र, सन्माचिन्ह व प्रत्येक विद्यालयातील पाच शिक्षकांचा मानचिन्ह देवून गौरव केला.

Scroll to Top