उपक्रम

दि. १८ व १९ ऑगस्ट २०२४
मुंबई शाखा ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव लोकसंस्कृतीचें जतन व्हावें. लोककलेचींआवड निर्माण व्हावीं लोककला मुलांच्या मनांत रुजावी, लोककलेचें ज्ञान मुलांना मिळावें आणि मुख्य म्हणजें आजची मुलं गॅझेटच्या विळख्यांत वेढलीं गेलीं आहेत, त्यांना त्यापासून प्रवृत्त करावें. फिल्मी दुनियेतून लोककलेच्या प्रांगणात अलगद घेऊन यावें , या प्रामाणिक हेतूनें बाल- रंगभूमी मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षा आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ नीलम ताई शिर्के- सामंत मॅडम यांनी’ जल्लोष लोककलेचा, हा अतिशय सुंदर उपक्रम सुरू करण्यांस सांगितलें.आणि त्यांच्याच प्रेरणेंतून ‘बालरंग- भूमी बृहन्मुंबई शाखेने” जल्लोष लोककला २०२४’ १८ आणि १९ ऑगस्ट २०२४ ला ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह भायखळा’ मुंबई येथे सादर केला.
समूह लोकगीतांत १० संघ आणि समूहलोकनृत्यांत ११ संघ होतें. तिन्ही परीक्षकांनी अतिशय पारदर्शकपणे परीक्षण करून क्रमांक काढलेत. तदनंतर मध्यवर्ती बाल- रंगभूमीच्या अध्यक्षा आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ नीलमताई शिर्के- सामंत यांच्या हस्तें पारितोषिक वितरण समारंभ झाला.
दुसऱ्या दिवशीं म्हणजेच १९ ऑगस्ट २०२४ ला एकल नृत्य २०, एकल गीत २० आणि एकल वादनाचे सहा असे सादरीकरण झालें. याप्रसंगी नीलमताईंनी छोट्या छोट्या बालशिलेदारांचे अगदीं तोंडभरून कौतुक केलें. आणि असे कार्यक्रम आपण दरवर्षी घेऊ, त्यायोगें बालविकास घडवून आणूं. असें आश्वासनही दिलें. दोन्ही दिवसांचे समूह नृत्य समूह गायन, एकल नृत्य, एकल गायन, एकल वादन हे सर्वच अविष्कार मुलांनी अतिशय ताकदीनें सादर केलेंत. बाल- प्रेक्षक तसेंच बाकीच्या प्रेक्षकांनीहीं त्यांना मनमुराद दाद दिलीं.

दि. १९ ऑक्टोबर २०२४
२०० दिव्यांग बालकलावंतांच्या सहभागाचा कलामहोत्सव ‘यहाँ के हम सिकंदर’ मध्यवर्ती बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री माननीय नीलमताई शिर्के -सामंत यांच्या प्रेरणेंतून बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेने ‘यहाॅ के हम सिकंदर’हा दिव्यांग मुलांचा कला महोत्सव यशवंत नाट्यमंदिर येथे साजरा केला. प्रथम सर्वच दिव्यांग मुलं, शिक्षक आणि पालकांना अध्यक्ष तुलालवार सर,कार्याध्यक्ष ज्योती निसळ,सहकार्यवाह हनुमान पाडमुख, म्हापणकर मॅडम यांनी फुलं देऊन त्यांचं स्वागत केलं. मान्यवरांच्या उपस्थितीत कांही दिव्यांग मुलांच्या हस्तें दीप -प्रज्वलन करण्यात आलें. नंदकुमार जुवेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.पुरस्कार प्राप्त शिक्षकांना ट्रॉफी देऊन त्यांचाही सन्मान यावेळीं करण्यांत आला. दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचे दहा स्टॉल्स होतें. त्या सर्वांना नीलमताई शिर्के -सामंत त्यांनी भेट दिली आणि सगळ्यांच़ं खूप कौतुक केलं. तेरा संघाच्या जवळ जवळ 200 दिव्यांग कलाकारांनी आपली, कला अतिशय सुंदर रीतीने सादर केलीं. त्यात डान्स होतें,,गाणीं होती, नाटक होतं, चित्रकला होती एवढेच नाही तर आधारिका फाउंडेशनच्या एका अंध मुलीनें रंगमंचावर स्केटिंगही करून दाखवलें. आयुष्यांत एखादी उणीव असेल तर ती आपल्या जिद्दीनें कशी भरून काढायचीं, त्यावर कशी मात करायचीं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही दिव्यांग मुलं.ही निरागस मुलं , त्यांचे शिक्षक आणि पालक या सगळ्यांचाचं उत्साह खूप अवर्णनीय होता .या मुलांचें सादरीकरण बघून खरंच,’ यहाँ के हम सिकंदर ‘हे शिर्षक किती समर्पक आहे याची प्रचितीं आलीं.