उपक्रम

दि. १४ सप्टेंबर २०२४
बालरंगभूमी परिषद रत्नागिरी जिल्हा शाखा आणि श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी रत्नागिरी मधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सकाळी ९ वाजल्यापासून बालकलाकारांसाठी चित्रकला आणि गणेश मूर्ती बनवण्याची स्पर्धा शहरातील बालकलाकारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात स्पर्धा पार पडली. स्पर्धेनंतर बालदोस्तांना श्री रत्नागिरी राजाचा प्रसाद देण्यात आला.

दि. १८ सप्टेंबर २०२४
श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव मित्र मंडळ यांच्या सहकार्याने अथर्वशीर्ष पठण स्पर्धा घेण्यात आली. यात सुमारे ८० विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला तर विविध शाळांमधील एकूण २५१ विद्यार्थ्यांनी बाप्पा समोर अथर्वशीर्षाचे ११ वेळा एकत्रित पठण केले.

दि. ३ ऑक्टोबर २०२४
रत्नागिरी शाखा : अभिनेते प्रशांतजी दामले यांची सदिच्छा भेट
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद माध्यवर्तीचे अध्यक्ष प्रशांतजी दामले यांची बालरंगभूमी परिषद शाखा रत्नागिरी तर्फे सदिच्छा भेट घेतली गेली आणि शाखेच्या कामाबद्दल माहिती दिली.

दि. ५ ऑक्टोबर २०२४
दिनांक ४ आणि ५ ऑक्टोबर २०२४ रोजी चिपळूण येथे लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध अंगी अशा लोककलांचे सादरीकरण करण्यात करून मुलांनी प्रेक्षकांची मने जिंकली. सुमारे ३४ समूह कला आणि ७० एकल कला सादर करण्यात आल्या.