कार्यक्रम

दि. १८ व १९ ऑगस्ट २०२४
मुंबई शाखा ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव लोकसंस्कृतीचें जतन व्हावें. लोककलेचीं आवड निर्माण व्हावीं लोककला मुलांच्या मनांत रुजावी, लोककलेचें ज्ञान मुलांना मिळावें आणि मुख्य म्हणजें आजची मुलं गॅझेटच्या विळख्यांत वेढलीं गेलीं आहेत, त्यांना त्यापासून प्रवृत्त करावें. फिल्मी दुनियेतून लोककलेच्या प्रांगणात अलगद घेऊन यावें , या प्रामाणिक हेतूनें बाल- रंगभूमी मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षा आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ नीलम ताई शिर्के- सामंत मॅडम यांनी’ जल्लोष लोककलेचा, हा अतिशय सुंदर उपक्रम सुरू करण्यांस सांगितलें.आणि त्यांच्याच प्रेरणेंतून ‘बालरंग- भूमी बृहन्मुंबई शाखेने” जल्लोष लोककला २०२४’ १८ आणि १९ ऑगस्ट २०२४ ला ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह भायखळा’ मुंबई येथे सादर केला.
समूह लोकगीतांत १० संघ आणि समूहलोकनृत्यांत ११ संघ होतें. तिन्ही परीक्षकांनी अतिशय पारदर्शकपणे परीक्षण करून क्रमांक काढलेत. तदनंतर मध्यवर्ती बाल- रंगभूमीच्या अध्यक्षा आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ नीलमताई शिर्के- सामंत यांच्या हस्तें पारितोषिक वितरण समारंभ झाला.
दुसऱ्या दिवशीं म्हणजेच १९ ऑगस्ट २०२४ ला एकल नृत्य २०, एकल गीत २० आणि एकल वादनाचे सहा असे सादरीकरण झालें. याप्रसंगी नीलमताईंनी छोट्या छोट्या बालशिलेदारांचे अगदीं तोंडभरून कौतुक केलें. आणि असे कार्यक्रम आपण दरवर्षी घेऊ, त्यायोगें बालविकास घडवून आणूं. असें आश्वासनही दिलें. दोन्ही दिवसांचे समूह नृत्य समूह गायन, एकल नृत्य, एकल गायन, एकल वादन हे सर्वच अविष्कार मुलांनी अतिशय ताकदीनें सादर केलेंत. बाल- प्रेक्षक तसेंच बाकीच्या प्रेक्षकांनीहीं त्यांना मनमुराद दाद दिलीं.

दि. १९ ऑक्टोबर २०२४
२०० दिव्यांग बालकलावंतांच्या सहभागाचा कलामहोत्सव ‘यहाँ के हम सिकंदर’ मध्यवर्ती बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री माननीय नीलमताई शिर्के -सामंत यांच्या प्रेरणेंतून बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेने ‘यहाॅ के हम सिकंदर’हा दिव्यांग मुलांचा कला महोत्सव यशवंत नाट्यमंदिर येथे साजरा केला. प्रथम सर्वच दिव्यांग मुलं, शिक्षक आणि पालकांना अध्यक्ष तुलालवार सर,कार्याध्यक्ष ज्योती निसळ,सहकार्यवाह हनुमान पाडमुख, म्हापणकर मॅडम यांनी फुलं देऊन त्यांचं स्वागत केलं. मान्यवरांच्या उपस्थितीत कांही दिव्यांग मुलांच्या हस्तें दीप -प्रज्वलन करण्यात आलें. नंदकुमार जुवेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.पुरस्कार प्राप्त शिक्षकांना ट्रॉफी देऊन त्यांचाही सन्मान यावेळीं करण्यांत आला. दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचे दहा स्टॉल्स होतें. त्या सर्वांना नीलमताई शिर्के -सामंत त्यांनी भेट दिली आणि सगळ्यांच़ं खूप कौतुक केलं. तेरा संघाच्या जवळ जवळ 200 दिव्यांग कलाकारांनी आपली, कला अतिशय सुंदर रीतीने सादर केलीं. त्यात डान्स होतें,,गाणीं होती, नाटक होतं, चित्रकला होती एवढेच नाही तर आधारिका फाउंडेशनच्या एका अंध मुलीनें रंगमंचावर स्केटिंगही करून दाखवलें. आयुष्यांत एखादी उणीव असेल तर ती आपल्या जिद्दीनें कशी भरून काढायचीं, त्यावर कशी मात करायचीं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही दिव्यांग मुलं.ही निरागस मुलं , त्यांचे शिक्षक आणि पालक या सगळ्यांचाचं उत्साह खूप अवर्णनीय होता .या मुलांचें सादरीकरण बघून खरंच,’ यहाँ के हम सिकंदर ‘हे शिर्षक किती समर्पक आहे याची प्रचितीं आलीं.

दि. १३ ऑक्टोबर २०२४
ठाणे शाखा : यहाँ के हम सिकंदर कलामहोत्सव उत्साहात
बालरंगभूमी परिषद ठाणे शाखेतर्फे दि. १३ ऑक्टोबर रोजी ठाकरे सभागृह, तीन हात नाका, ठाणे येथे ‘दिव्यांग कलामहोत्सव’ आयोजित केला होता. त्याला ठाणे आणि परिसरातून उदंड प्रतिसाद मिळाला. ठाणे शाखेचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ, कोषाध्यक्ष अमोल आपटे आणि त्यांच्या कार्यकारिणीने ठाणे आणि परिसातील (पालघर, बदलापूर, वांगणी इत्यादी) एकूण २४ शाळांना सहभागी करुन घेतले. यात कर्णबधीर, मूकबधीर, विशेष मुले तसेच अंध विद्यार्थीही होते. मेघना साने, नूतन बांदेकर व सुचेता रेगे यांनी शाळांच्या शिक्षकांशी संपर्क करून शिक्षकांचीही उपस्थिती असावी, असे सूचित केले होते. विद्यार्थ्यांनी गायन, वादन, नृत्ये, नाट्य तसेच वेगवेगळ्या वाद्यवादनाचे सादरीकरण केले. सर्व शाळांसाठी एक चित्रकला विभाग वेगळा ठेवला होता. एका स्वतंत्र हॉलमध्ये विद्यार्थ्यांनी आपली चित्रे पूर्ण केली.

दि. २७ सप्टेंबर २०२४
कल्याण येथे बालकलाकारांचा लोककलेचा महाजल्लोष
बालरंगभूमी परिषद मध्यावर्तीच्या अध्यक्षा ॲड.निलम शिर्के – सामंत यांच्या संकल्पनेतून “जल्लोष लोककलेचा” हा लोककला महोत्सव २७ सप्टेंबर २०२४ रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती आयोजित,बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेने कल्याण डोंबिवली महानगर पालिका शिक्षण विभागाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सांघिक नृत्याने महोत्सवाची दणक्यात सुरुवात झाली. गोंधळ, जोगवा, शेतकरी नृत्य, कोळी नृत्य बघून पाहुणे प्रेक्षक भारावून गेले. सांघिक गायन, एकल वादन, एकल गायन, एकल नृत्य अश्या एकापेक्षा एक लोकनृत्याचे सदरिकरण झाले.रसिकप्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात उत्तम प्रतिसाद दिला. व कल्याण शाखेला उत्तम नियोजन करून कलावंतांना रंगमंच उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद दिले. सादरीकरण संपल्यानंतर लगेच पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून लोककलावंत श्री.संदेश विठ्ठल उमप, श्री.हेमंत यादगिरे,श्री.रवींद्र सावंत, श्री माणिक शिंदे, मान्यवर परीक्षक व बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेचे पादाधीकारी या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. कार्याध्यक्ष श्री.शिवाजी शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त व शिक्षण विभागाचे उपायुक्त व पदाधिकारी यांनी अत्रे रंगमंदिर उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.लोकलेची मराठमोळी वेशभूषा करून विकास सोनवणे यांनी निवेदनात रंगत आणली.

दि. १ नोव्हेंबर २०२४
ठाणे शाखेतर्फे ग्रामीण भागातील जि.प.शाळेत दिवाळी पहाट
दिव्यांग महोत्सवामुळे ठाणे शाखेचा उत्साह वाढला. ठाणेवैभवने सुवर्णमहोत्सवानिमित्त भिवंडी तालुक्यातील कवाड गावातील जिल्हा परिषद शाळेत दिवाळी पहाट साजरी केली. स्वतः सौ.निलमताई २५० मुलांचे जेवण घेऊन मुलांच्या आनंदात सहभागी झाल्या. शाखेच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. मुलांना कंदील बनविण्याचे, रांगोळी आणि पणत्या रंगविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. संपादक मिलिंद बल्लाळ, मंजुषा बल्लाळ, कुमुदिनी बल्लाळ, मेघना साने, सुचेता रेगे, मंदार टिल्लू, दयानंद पाटील आदींनी यासाठी परिश्रम घेतले.

दि. १८ ऑक्टोबर २०२४
कल्याण येथे दिव्यांग कलावंतांचा महोत्सव उत्साहात संपन्न
कल्याण येथे दिव्यांग मुलांचा कलामहोत्सव ‘यहाँ के हम सिकंदर’ १८ ऑक्टोबर २०२४ रोजी आचार्य अत्रे रंगमंदिरात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या कलामहोत्सवामध्ये १४ दिव्यांग शाळांमधील दोनशे दिव्यांग बालकलावंतांनी सहभाग घेतला होता. दिव्यांग बालकलाकारांनी सादर केलेल्या सरस सादरीकरणांनी सर्व रसिक प्रेक्षक भारावून गेले होते. प्रत्येक सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांचा गजर करत उत्तम प्रतिसाद दिला.

दि. ५ ऑक्टोबर २०२४
दिनांक ४ आणि ५ ऑक्टोबर २०२४ रोजी चिपळूण येथे लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध अंगी अशा लोककलांचे सादरीकरण करण्यात करून मुलांनी प्रेक्षकांची मने जिंकली. सुमारे ३४ समूह कला आणि ७० एकल कला सादर करण्यात आल्या.

दि. १४ सप्टेंबर २०२४
बालरंगभूमी परिषद रत्नागिरी जिल्हा शाखा आणि श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी रत्नागिरी मधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सकाळी ९ वाजल्यापासून बालकलाकारांसाठी चित्रकला आणि गणेश मूर्ती बनवण्याची स्पर्धा शहरातील बालकलाकारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात स्पर्धा पार पडली. स्पर्धेनंतर बालदोस्तांना श्री रत्नागिरी राजाचा प्रसाद देण्यात आला.

दि. १८ सप्टेंबर २०२४
श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव मित्र मंडळ यांच्या सहकार्याने अथर्वशीर्ष पठण स्पर्धा घेण्यात आली. यात सुमारे ८० विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला तर विविध शाळांमधील एकूण २५१ विद्यार्थ्यांनी बाप्पा समोर अथर्वशीर्षाचे ११ वेळा एकत्रित पठण केले.

दि. १४ नोव्हेंबर २०२४
बाल दिनाचे औचित्य साधून मध्यवर्ती कार्यालयाच्या अध्यक्षा नीलम ताई शिर्के सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरी शहरातील मतिमंद, गतिमंद, मूकबधिर आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या तीन शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांसोबत हितगुज साधले.

दि. ३ ऑक्टोबर २०२४
रत्नागिरी शाखा : अभिनेते प्रशांतजी दामले यांची सदिच्छा भेट
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद माध्यवर्तीचे अध्यक्ष प्रशांतजी दामले यांची बालरंगभूमी परिषद शाखा रत्नागिरी तर्फे सदिच्छा भेट घेतली गेली आणि शाखेच्या कामाबद्दल माहिती दिली.

दि. १८ ऑगस्ट २०२४
पुणे शाखा : लोककला प्रशिक्षण शिबिर संपन्नबाल रंगभूमी परिषद पुणे शाखेच्या वतीने लोककला प्रशिक्षण शिबिर चाकण येथील स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे विद्यालयात झाले. यावेळी १५५ हून अधिक मुलांनी सहभाग नोंदवला. लोककला प्रशिक्षण शिविर दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी चाकण येथे आयोजित करण्यात आले होते.

दि. २४ सप्टेंबर २०२४
पुण्यातील जल्लोष लोककलेच्या महोत्सवात ५५० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
बालरंगभूमी परिषद पुणे शाखेच्या वतीने लोककला महोत्सव यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे लोककला महोत्सवचे आयोजन करण्यात आले. होते. यामध्ये गायन, वादन, नृत्य, समूह गायन, समूह नृत्य अशा विभागातून सुमारे ५५०हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्षा नीलमताई शिर्के सामंत यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

दि. १७ ऑक्टोबर २०२४
पुणे येथे दिव्यांग कलावंतांचा महामहोत्सव रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह पिंपरी चिंचवड या ठिकाणी विशेष मुलांचा यहा के हम सिकंदर या सांस्कृतिक कार्यक्रमांचा महामहोत्सव संपन्न झाला. दिव्यांग महोत्सवाची संकल्पना बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती च्या अध्यक्ष आणि अभिनेत्री नीलम शिर्के – सामंत यांच्या माध्यमातून साकार झाली. दिव्यांग महामहोत्सवाचे उद्घाटन नटराज पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले. विशेष मुलांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या 33 शिक्षकांचा सन्मान नीलम शिर्के सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. दिव्यांग महोत्सवामध्ये ३३ शाळांनी सहभाग नोंदवला. निगडी, गोखले नगर ,कोथरूड, लक्ष्मी रोड, आळंदी देवाची, शिरूर, पाबळ, वाजे वाडी, पेरणे फाटा, चरोली बुद्रुक, बारामती भोसरी तळेगाव दौंड, मांजरी बुद्रुक, बिबवेवाडी, कोरेगाव पार्क , लोणी काळभोर ,शिवाजीनगर ,अंबडवेट, लोणीकंद, पुणे, धायरी, चिंचवड, बारामती, हिंगणे खुर्द, आंबेगाव या ठिकाणावरून शाळा आल्या होत्या. महोत्सवातील सहभागी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना जेवणाची सुविधा उपलब्ध होती त्याचबरोबर १८ वर्षावरील कार्यशाळेमध्ये असणाऱ्या मुलांच्या तयार केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन देखील होते. स्टॉलला ही प्रचंड प्रतिसाद मिळाला. शाळांनी समाधान व्यक्त केले. विशेष मुलांसाठी रमेश गडदे आणि धीरज बिरदवडे यांनी स्वीट उपलब्ध करून दिले.दिव्यांग महोत्सवामध्ये ३१ शाळांनी उत्कृष्ठ सादरीकरण केले. ५३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

दि. २२ सप्टेंबर २०२४
सांगलीत लोककलांचा जल्लोष जिल्ह्यातील २७ विद्यालयांतील तब्बल ४८० बालकलाकारांनी आज रंगभूमीवर सलग १२ तास ४८ लोककलांचे त्यांनी सादरीकरण केले. या बालकलाकारांना दाद देण्यासाठी भावे नाट्यमंदीर खचाखच भरले होते. बालरंगभूमी परिषद शाखा सांगलीच्यावतीने आयोजित महोत्सवामध्ये एकलमध्ये बालकलाकारांनी संबळवादन, ढोल, ढोलकी, जागर, पिंगळा, कीर्तन, पाळणा, तबला, पोवाडा यासह तलवारबाजीचेही सादरीकरण केले. तसेच समूहमध्ये मंगळागौर, वंजारी नृत्य, वारकरी, डोंबारी नृत्य, आदिवासी नृत्य, वाघ्या-मुरळी, लावणीमधील सवाल-जवाब, भारूड, धनगरी ओव्या, सामाजिक संदेश देणारे नृत्य सादर केले. या महोत्सवाला परीक्षक म्हणून राम चौगुले,पद्माक कुरकुटे, श्वेता कोंडीकर, सचिन चौधरी, धनश्री देशपांडे, विजय माने यांनी केले.सकाळी ८ वाजेपासून सुरु झालेला महोत्सव संध्याकाळपर्यंत रंगला.

दि. १६ ऑक्टोबर २०२४
मिरजेतील बालगंधर्व नाट्यमंदिरात रंगला दिव्यांग महोत्सव विशेष मुलांचा महोत्सव यहा के हम सिकंदर हा बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे आयोजित करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील २० दिव्यांग शाळा ने यामध्ये सहभाग घेतला होता सकाळी अकरा वाजता मुलांच्या सादरीकरणाला सुरुवात झाली दुपारी एक वाजता बालरंग भूमी परिषद मुंबई चे अध्यक्ष नीलमताई शिर्के सामंत यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व वक्त्यांनी दिव्यांग मुलांना आपल्या भाषणाने प्रभावित केले दिवसभर या सर्व मुलांचे सादरीकरण होत होते नाटकाच्या बाहेरच्या बाजूला कार्यशाळेतील मुलांनी तयार केलेले सहा स्टॉल लावण्यात आले होते त्यावर नागरिकांनी वस्तूंची खरेदी केली एकंदर दिव्यांग प्रेक्षक पालक व शिक्षक यांना आनंद देणारा हा कार्यक्रम ठरला.

दि. २९ सप्टेंबर २०२४
जल्लोष लोककलेचा महोत्सवाला कोल्हापूरकरांचा उस्फूर्त प्रतिसाद बालरंगभूमी परिषद कोल्हापूरतर्फे आयोजित जल्लोष लोककलेचा या महोत्सवाला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्याचवेळी अनेक पातळीवर झालेल्या संवादांनी अशा प्रकारे मुलांसाठी विविध उपक्रमांच्या आयोजनाची आवश्यकता अधोरेखित झाली. या महोत्सवाने शहरात संपर्क वाढण्यासह कला विषयाकडे बालकांचा ओढा अधिक असल्याचे जाणवले. दि. २८ व २९ सप्टेंबर २०२४ झालेल्या या लोककला महोत्सवात सांघिक प्रकारात १८ लोकनृत्याचे संघ, ०६ लोकगीत संघ असे एकूण २९० बालकलावंत तर एकल सादरीकरणात नृत्य २०, गीत गायन २२, वाद्यवादनासाठी ६ असा एकूण ४८ बालकलावंतांचा सहभाग होता.

दि. १७ ऑक्टोबर २०२४
दिव्यांग कलावंताच्या सादरीकरणाने भारावले कोल्हापूरकर बालरंगभूमी परिषद कोल्हापूर शाखेतर्फे यहाँ के हम सिकंदर या विशेष बालकांच्या महोत्सवात आलेल्या सांस्कृतिक अनुभवाने प्रेक्षक व बालरंगभूमीचे सर्व कार्यकर्ते भारावून गेले होते. या महोत्सवात १२ संघांचा सहभाग होता तर २२० दिव्यांग बालकलावंतांनी आपले सादरीकरण केले. यावेळी २५ दिव्यांग प्रेक्षकांनीही उपस्थित राहून महोत्सवाचा आनंद घेतला. मुलांच्या हाचलाचील, बोलण्यात अडखळलेपणा असला तरी सरावातून ही मुले काहीतरी नवं शिकत आहेत. कला सादर करत आहेत. त्याच मुलांनी परिश्रमातून साकारलेल्या बहारदार नृत्य व नाट्य सादरीकरणाने रसिकांना थक्क केले. यावेळी मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्ष नीलम शिर्के सामंत, कार्याध्यक्ष राजू तुलालवार उपस्थित होते. प्रमोद कसबे, प्रिती गुळवणी, वेदा सोनुले, अविनाश देशमुख, डॉ.संजय पाठारे, डॉ.अंजली पाटील, मुग्धा जोशी, अरविंद कोळी, अविनाश गायकवाड, वैदेही जाधव, दीपक बिडकर, सचिन पाटील, प्रथमेश सिध्दार्थ, अनिल काजवे यांनी संयोजन केले. मनीष आपटे यांनी सूत्रसंचालन केले. युवराज केळुसकर यांनी आभार मानले.

दि. २० सप्टेंबर २०२४
नाशिक : जल्लोष लोककलेचा ५०० हून बालकलावंतांचा सहभाग बालरंगभूमीतर्फे जल्लोष लोककलेचा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. पारंपारिक नृत्य, गायन आदी कलांचे सादरीकरण करण्यात आले. नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात हा महोत्सव संपन्न झाला.

दि. २१ ऑक्टोबर २०२४
यहाँ के हम सिकंदर महोत्सवात दिव्यांग बालकांच्या कलागुणांचा सन्मान सामान्यांप्रमाणे दिव्यांगांच्या कलागुणाचा सन्मान व्हावा. कारण दिव्यांग भगवंताचे अत्यंत लाडके आहेत. त्यामुळे कोणताही न्यूनगंड न बाळगता आपल्यातील कलागुण त्यांनी सादर करावे या उद्देशाने ‘यहाँ के हम सिकंदर’ या कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

दि. २ नोव्हेंबर २०२४
मंगळवेढा : किल्ले बनविण्याच्या स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बालरंगभूमी परिषद मंगळवेढा शाखेतर्फे किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस झालेल्या या स्पर्धेत मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील ३० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.

दि. ९ सप्टेंबर २०२४
बालरंगभूमी परिषद, मंगळवेढा शाखेतर्फे गणेशोत्सवानिमित्त इंग्लिश स्कूल, मंगळवेढा प्रशालेत सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये 110 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

दि. ९ सप्टेंबर २०२४
बालरंगभूमी परिषद, मंगळवेढा शाखेतर्फे गणेशोत्सवानिमित्त शिवतेज प्राथमिक शाळा मंगळवेढा प्रशालेत गौरी गणपती वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये ३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

दि. १५ ऑक्टोंबर २०२४
मंगळवेढा शाखेतर्फे वाचनप्रेरणा दिन डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा” दिन साजरा करण्यात आला.बालाजी शिंदे यांनी मुलांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले.

दि. ३० ऑगस्ट २०२४
जल्लोष लोककलेचा महोत्सवाला साताऱ्यातील बालकलावंतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जागर लोककलेच्या अंतर्गत एक दिवसाचे लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ह्या मध्ये सर्व लोककला, लोककलेतील वाद्य त्यांची माहिती आणि लोककलेची महती यावर जाणकारांनी मार्गदर्शन केले . ह्या प्रशिक्षणात लोकशाहीर भानुदास गायकवाड, श्रीपति माने, श्री राजीव मुळये यांनी मार्गदर्शन केले . तसेच सादरीकरण ही केले . तसेच गोंधळी पोपट राव मोरे, किरण ढगे , वासुदेव असेलेल किसान घोडके यांनी ही सादरीकरण आणि माहिती दिली. तसेच नृत्य दिग्दर्शक श्री. धैर्यशील उत्तेकर, आणि त्यांचे सहकारी सूरज दयाळ, श्री मनोज जाधव यांनी उत्तम मार्गदर्शन केले . ह्या कार्यक्रमामुळे लहान मुलांच्यात लोककला , लोक कलेतील वाद्य, नृत्य ह्या बद्दल एक जागृतकता निर्माण झाली आणि आपल्या लोक कलेच्या इतिहासाची माहिती झाली. याच लोक कला शिबिरानंतर लोककला महोत्सव.. म्हणजे जल्लोष लोककलेचा हा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये सातारा आणि परिसरातील ७०० हून अधिक मुलांनी यामध्ये सहभाग घेतला. आणि १००० पेक्षा जास्त प्रेक्षक वर्गाने याचा आस्वाद घेतला. सातारा शहरात पाहिल्यादाच अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दि. १७ ऑगस्ट २०२४
बीडमध्ये बालकलावंतांच्या लोककलेचा जल्लोष जल्लोष लोककलेचा’ हा उपक्रम घेण्यात आला. बालरंगभूमी परिषद मुंबईच्या मा. अध्यक्ष निलम शिर्के यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत गायन, वादन आणि नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये सहभागी झालेल्या बालकलावंताना प्रमाणपत्र तर विजेत्या कलावंताना रोख रक्कमेच्या स्वरुपात पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात लोकगीत, समूहलोकनृत्य, वैयक्तीक लोकनृत्य, वैयक्तीक लोकवाद्य आदीसारख्या कला प्रकारांचे उत्तम सादरीकरण करण्यात आले.

दि. ५ ऑक्टोंबर २०२४
बीडमध्ये दिव्यांग बालकांनी जिंकली प्रेक्षकांची मने ‘यहाँ के हम सिकंदर’ या दिव्यांग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. जन्माने दिव्यांग असलेल्या परंतु जन्मजात कलागुण घेऊन जन्मलेल्या बालकांच्या कलागुणांना संधी देणारा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये अनेक दिव्यांग बालकांनी आपली कला सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत आणि कौतुक करण्यात आले.

दि. १६ सप्टेंबर २०२४
अहिल्यानगरमध्ये लोककलांचा जागर ‘जल्लोष लोककलेचा’ हा महोत्सव दि. १५ आणि १६ सप्टेंबर २०२४ या दोन दिवसांमध्ये भरवण्यात आला. माऊली सभागृहात रंगमंचावर गाव, सजवलेल्या झोपड्या, गावाचा पार, पारावरचे मोठे वडाचे झा असे नेपथ्य लावले होते. जणू हा महोत्सव गावात होतो आहे हे वेळोवेळी जाणवत होते. नटराज पूजन, दीपप्रज्वलन, प्रास्ताविक, स्वागत असा नेटका आणि कमी वेळात उद्‌घाटन सोहळा पार पडला. विशेषतः या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.राजसी भणगे आणि कु.अस्मी चावक या दोन विद्यार्थिंनींनीच केले. जल्लोष लोककलेचा महोत्सवात एकल नृत्यात १५, एकल वादनात ९, एकल गायनात २३ स्पर्धक सहभागी झाले होते तर समूह नृत्यामध्ये १९ तर समूह गायनामध्ये १२ संघ सहभागी झाले होते. समूहाच्या एकूण ३१ संघांनी तर एकलच्या ४७ बालकलाकारांनी सहभाग नोंदवून महोत्सवामध्ये आपले सादरीकरण केले.

दि. २५ ऑक्टोबर २०२४
अहिल्यानगरमध्ये ‘यहाँ के हम सिकंदर’ महोत्सवात २५० दिव्यांग बालकलाकारांचे सादरीकरण अहिल्यानगरमध्ये जिल्हा बालरंगभूमी परिषदेतर्फे ‘यहाँ के हम सिकंदर’ हा दिव्यांग महोत्सव दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ रोजी घेण्यात आला. या महोत्सवात एकूण २५० कलाकारांनी सहभाग नोंदवला. यावेळी दिव्यांग स्पर्धकांसाठी सभागृहामध्ये वैद्यकीय सेवेची व्यवस्था करण्यात आली होती.

दि. १ सप्टेंबर २०२४
लातूरमध्ये जल्लोष लोककलेचा महोत्सवाला उदंड प्रतिसाद जल्लोष लोककलेचा ह्या कार्यकर्मात लातूरमधील अनेक बालकलाकारांनी हिरीरीने सहभाग नोंदवला. लोककलेचे समिती प्रमुख म्हणून श्री. रवी सावंत सरांनी कार्य सांभाळले. जागर लोककलेच्या अंतर्गत दोन दिवसाचे लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. हा लोककला महोत्सव ३१ ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर २०२४ ह्या कालावधीत घेण्यात आला. ह्या मध्ये सर्व लोककला, लोककलेतील वाद्य, लोकगीते आणि लोकनृत्य यामध्ये अनेक बालकलाकारांनी सहभाग नोंदवला. ह्या लोककला महोत्सवासाठी परीक्षक म्हणून लाभलेले. .डॉ. विनोद निकम – लोकनृत्य, जतिन पांडे – लोकनृत्य, मयुरी अव्हाड – लोकनृत्य, संकेत राजपूत – संगीतकार गायक, अजिंक्य लिंगायत – शिव शाहीर लोककलावंत तज्ञ, कल्याण उगले – लेखक संगीतकार वादक, सुरज खरटमोल -लोककलावंत तज्ञ ह्या मंडळींचे परीक्षण आणि मार्गदर्शन बालकलाकारांना लाभले. ह्या कार्यक्रमास अंदाजे १००० प्रेक्षकवर्ग हजर होता.

दि. २३ ऑक्टोबर 2024
लातूरमध्ये रंगला दिव्यांग महोत्सव
यहॉ के हम सिकंदर हा महोत्सव घेण्यात आला. ह्या महोत्सवाचे समिती प्रमुख कार्य जिल्ह्याच्या उपाध्यक्षा (उपक्रम) सौ. सुवर्णा बुरांडे यांनी सांभाळले. हा महोत्सव २३ ऑक्टोबर २०२४ रोजी दयानंद सभागृह येथे घेण्यात आला

दि. १ ऑक्टोबर २०२४
नागपूर येथे १ ऑक्टोबर २०२४ ला जल्लोष लोककलेचा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात २६ शाळांनी सहभाग घेतला.

दि. २४ ऑक्टोबर २०२४
बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित बालरंगभूमी पारिषद नागपूर शाखा संयोजित दिव्यांग महोत्सव यहाँ के हम सिकंदर विशेष बालकांचा कला महोत्सवात २७ शाळांनी सहभाग नोंदविला.

दि. २२ सप्टेंबर २०२४
परभणी : जल्लोष लोककलेचामधून बालकांना झाली कला आणि संस्कृतीची ओळख
भावी पिढीला कला आणि संस्कृती यांची जाणीव व ओळख व्हावी या उद्देशाने बालरंगभूमी परभणीच्या वतीने १२ ऑगस्ट रोजी जल्लोष लोककलेचा लोककला प्रशिक्षण शिबिर विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले. ‘जल्लोष लोककलेचा’ हा परभणी जिल्हा शाखेतर्फे शनिवार, दि. २२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोककला महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास बालरंगभूमी परिषद मुंबई मध्यवर्ती शाखेच्या मा. अध्यक्ष अॅड. निलमताई शिर्के-सामंत या उपस्थित होत्या. टाळापासून ते चाळापर्यंत अनेक संमेलने पार पडलेल्या या नगरीत जल्लोष लोककलेचा हा महोत्सव उत्साहात पार पडला. औक्षण झाल्यानंतर निलमताई यांच्यासह स्वागताध्यक्ष परभणीचे पहिले महापौर प्रताप भैय्या देशमुख, ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या सचिव माजी प्राचार्य डॉ. संध्याताई दुधगावकर, संतोष धारासुरकर, परभणी शाखेचे अध्यक्ष आबा ढोले, उपाध्यक्ष प्रा.नितीन लोहट, गोंधळ सम्राट गुलाबराव कदम यांची उपस्थिती होती.समूह स्पर्धेत २८ तर एकल मध्ये ६२ स्पर्धक होते.

दि. १६ ऑगस्ट २०२४
बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेने ऑगस्ट महिन्यात ‘जल्लोष लोककलेचा’ या उपक्रमातंर्गत प्रथमतः जिल्ह्यातील ५ ठिकाणी लोककला कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेतील महाराष्ट्राच्या विशेषतः खान्देशच्या लोककलांविषयी विद्यार्थी – विद्यार्थिंनींना माहिती देण्यात आली. या कार्यशाळांतून ५ हजार विद्यार्थी – विद्यार्थिंनींनी सहभाग घेतला होता.

दि. २२ सप्टेंबर २०२४
७८० विद्यार्थ्यांच्या सहभागात जळगावात जल्लोष लोककलेचा दि. २१ व २२ सप्टेंबर असे दोन दिवस आयोजित केलेल्या या महोत्सवात ७८० बालकलावंतांनी आपल्या कलांचे सादरीकरण केले.दुसऱ्या दिवशी समूह लोकगीत व समूह लोकनृत्याच्या सादरीकरणात एकूण २७ शाळांचा सहभाग घेतला होता.पारितोषिक वितरणाच्या सोहळ्याप्रसंगी प्रास्ताविकात प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी दोन दिवसात झालेल्या महोत्सवाचा आढावा मांडला. या महोत्सवात दोन दिवसात ७८० बालकलावंतांनी लोककलांचे सादरीकरण केले. तसेच या महोत्सवाला शहरातील भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाऊंडेशन तसेच मृदंग ॲड्‌स यांचे लाभलेल्या अनमोल सहकार्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.श्रध्दा पाटील यांनी केले.

दि. १० ऑक्टोबर २०२४
जळगाव : दिव्यांग बालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारा कलामहोत्सव बालरंगभूमी परिषदेतर्फे ‘यहाँ के हम सिकंदर’ या विशेष मुलांच्या कलामहोत्सवाचे जळगावात आयोजन करण्यात आले होते. शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रंगलेल्या या कलामहोत्सवाने ६०० दिव्यांग बालकांच्या व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले. दिव्यांग बालकांसाठी गेल्या २२ वर्षांपासून काम करत असणाऱ्या बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विशेष मुलांच्या कलामहोत्सवाच्या उद्‌घाटन प्रसंगी रंगमंचावर बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर प्रविण सिंग, नवजीवन प्लस सुपरशॉपचे संचालक अनिलभाई कांकरिया, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, विशेष दिव्यांग विभागाच्या वैद्यकिय सामाजिक कार्यकर्त्या माधुरी भागवत, बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्तीकडून आलेले निरीक्षक नागसेन पेंढारकर आदी उपस्थित होते.सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलन झाल्यानंतर उत्कर्ष मतिमंद विद्यालयाचा विद्यार्थी सागर गायकवाड याने स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक करतांना विनोद ढगे यांनी या कलामहोत्सव आयोजनामागची भूमिका व महत्व विषद केले. कलामहोत्सवाच्या समारोप प्रसंगी डॉ.इंद्राणी मिश्रा व हेमाताई अमळकर यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी दिव्यांग बालकांचे कौतुक करण्यासोबतच सर्व सहभागी दिव्यांग बालकलावंतांना व दिव्यांग विद्यालयांना प्रमाणपत्र, सन्माचिन्ह व प्रत्येक विद्यालयातील पाच शिक्षकांचा मानचिन्ह देवून गौरव केला.

दि. २८ सप्टेंबर २०२४
इचलकरंजी बालरंगभूमी परिषद शाखेचे उद्‌घाटन संपन्न बालरंगभूमी परिषद इचलकरंजी शाखेचे उद्‌घाटन २८ सप्टेंबर २०२४ रोजी झाले. लोककला तसेच दिव्यांग महोत्सवाची धामधुम होती परंतु वेळेअभावी हे महोत्सव घेता आले नाहीत मात्र लोककला महोत्सवा करीता सांगली शाखेस परिक्षक म्हणुन सौ. रेश्मा कोंडेकर, सचीन चौधरी, पदमाकर कुरकुटे उपस्थीत होते तर कोल्हापूर शाखेच्या दिव्यांग महोत्सवाचे संपुर्ण सूत्रसंचालन इचलकरंजी शाखा अध्यक्ष मनिष आपटे यांनी यशस्वीरित्या केले.एक शुभेच्छा संदेश सैनिकांसाठी या अंतर्गत कोल्हापूर व इचलकरंजी शाखेच्या वतीने सैनिकांसाठी बालचमुंकडुन तयार करुन घेण्यात आलेल्या दिवाळी भेटकार्ड कोल्हापूर येथील मराठा लाईट इंफ्रंन्ट्री सैनिकांना सुपुर्त करणेत आली. सैनिकांसह तेथील पदाधिकाऱ्यांनी बालचमुंच्या कलाकृतीचे तसेच शिक्षक-शिक्षीकांचे कौतुक केले.

दि. ७ ऑक्टोबर २०२४
नंदुरबारमध्ये ४५० बालकलावंतांनी सादर केल्या लोककला बालरंगभूमी परिषदेच्या लोककला महोत्सवात जिल्ह्यातील ३५ शाळांच्या ४५० बालकलावंतांनी महाराष्ट्रातील विविध लोककलांचे दर्शन घडविले. बालकलावंतांच्या या सादरीकरणाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात झालेल्या या महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ लोककलावंत रायसिंग हिरा पाडवी यांनी केले. यावेळी बालरंगभूमी परिषदेचे कार्याध्यक्ष राजीव तुलालवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी, उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण, बालरंगभूमी परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य नागसेन पेंढारकर उपस्थित होते.

दि. ९ ऑक्टोबर २०२४
नंदुरबारमध्ये दिव्यांगाना मिळाला हक्काचा रंगमंच दिव्यांग बालकलावंतांना हक्कांचा रंगमंच उपलब्ध करून देणारा यहाँ के हम सिंकदर नंदुरबारला ९ ऑक्टोबरला साजरा करण्यात आला. इंदिरा मंगल कार्यालयात उत्साहात पार पडलेल्या या महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव मोरे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन वळवी, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आत्मारामबापू इंदवे, बारकू पाटील, बालरंगभूमी परिषदेचे मध्यवर्ती कार्यकारिणी सदस्य योगेश शुक्ल, तसेच नंदुरबार जिल्हा शाखेचे प्रमुख कार्यवाह नागसेन पेंढारकर, अध्यक्ष राजेश जाधव, उपाध्यक्ष मनोज सोनार आदी उपस्थित होते. महोत्सवात एकूण ९ दिव्यांगा शाळांमधील ११० दिव्यांग कलावंतांनी सहभाग नोंदविला तसेच १०० दिव्यांग प्रेक्षकांनी या महोत्सवाचा आनंद घेतला.

Scroll to Top