उपक्रम

दि. १६ सप्टेंबर २०२४
अहिल्यानगरमध्ये लोककलांचा जागर ‘जल्लोष लोककलेचा’ हा महोत्सव दि. १५ आणि १६ सप्टेंबर २०२४ या दोन दिवसांमध्ये भरवण्यात आला. माऊली सभागृहात रंगमंचावर गाव, सजवलेल्या झोपड्या, गावाचा पार, पारावरचे मोठे वडाचे झा असे नेपथ्य लावले होते. जणू हा महोत्सव गावात होतो आहे हे वेळोवेळी जाणवत होते. नटराज पूजन, दीपप्रज्वलन, प्रास्ताविक, स्वागत असा नेटका आणि कमी वेळात उद्‌घाटन सोहळा पार पडला. विशेषतः या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.राजसी भणगे आणि कु.अस्मी चावक या दोन विद्यार्थिंनींनीच केले. जल्लोष लोककलेचा महोत्सवात एकल नृत्यात १५, एकल वादनात ९, एकल गायनात २३ स्पर्धक सहभागी झाले होते तर समूह नृत्यामध्ये १९ तर समूह गायनामध्ये १२ संघ सहभागी झाले होते. समूहाच्या एकूण ३१ संघांनी तर एकलच्या ४७ बालकलाकारांनी सहभाग नोंदवून महोत्सवामध्ये आपले सादरीकरण केले.

दि. २५ ऑक्टोबर २०२४
अहिल्यानगरमध्ये ‘यहाँ के हम सिकंदर’ महोत्सवात २५० दिव्यांग बालकलाकारांचे सादरीकरण अहिल्यानगरमध्ये जिल्हा बालरंगभूमी परिषदेतर्फे ‘यहाँ के हम सिकंदर’ हा दिव्यांग महोत्सव दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ रोजी घेण्यात आला. या महोत्सवात एकूण २५० कलाकारांनी सहभाग नोंदवला. यावेळी दिव्यांग स्पर्धकांसाठी सभागृहामध्ये वैद्यकीय सेवेची व्यवस्था करण्यात आली होती.

Scroll to Top